
कराड : कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन प्रतिवर्षी प्रमाणे दिनांक २४ ते २८ नोव्हेंबर अखेर भरत असून प्रदर्शनाची तयारी वेगात सुरू आहे.प्रदर्शनात गजेंद्र नावाचा दोन टन वजनाचा रेडा पशु प्रदर्शनात सहभागी होणार असल्याने त्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
बेळगांव येथील ज्ञान देव नाईक यांचा हा रेडा असून त्याचे वजन 2 टन असल्याने त्याचे नांव त्यांनी गजेंद्र ठेवले आहे.अनेक प्रदर्शनात हा रेडा सर्वाचा कुतूहल व आकर्षणाचा विषय राहिला आहे.या रेड्याचा प्रतिदिनी 2500 ते 3000 हजार इतका खर्च असून रोज 5 किलो सफरचंद ,गव्हाचा आटा, आणि काजू चा खुराक दिला जातो. या गजेंद्र ने महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक प्रदर्शन गाजवली असून दीड कोटी रुपयांची मागणी या रेड्याचा आली होती.
हा रेडा कराड च्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात दाखल होत असून याबरोबत अनेक पशु पक्षी या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
या रेड्याला बघण्यासाठी स्वंतत्र व्यवस्था केली असून गजेंद्रची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे.