दादांचे मोदी – शहा ऐकत असतील तर, त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळून द्यावी
खासदार सुप्रिया सुळे यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना टोला

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. मी ६० व्या वर्षी बंड केलं पण त्यांनी ३८ व्या वर्षीच केलं होतं, असंही अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता म्हटलं.
दरम्यान आता या टीकेला सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ३८ व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्या मागे माझ्या आणि दादांसारखी घराणेशाही नव्हती असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
शरद पवार यांनी ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचे सत्य काय आहे ते शालिनाताई पाटील यांनी सविस्तरपणे मांडले होते. ३८ व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांच्या मागे माझ्या आणि दादांसारखी घराणेशाही नव्हती. दादांचे मोदी – शहा ऐकत असतील तर, त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळून द्यावी असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राज्यमंत्री मंडळामध्ये सध्या गॅंगवार सुरु आहे. कोणीच कोणाचे ऐकत नाही, असंही त्या यावेळी म्हणाल्या.