राजकियविदेशसातारा

संसदेत गोंधळ घालणाऱ्या पाच संशयित आरोपींना अटक

संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

नवी दिल्ली: देशाच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त बुधवारी पुन्हा एकदा संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा घटना घडली.

लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी सभागृहात उडी मारून घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी एका नळकांड्यातून पिवळा धूर पसरवून सभागृहात गोंधळ घातला. या घटनेनंतर सभागृहातील काही खासदारांनी या तरुणाना पकडून ठेवले आणि सुरक्षा पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर काही वेळातच संसद भवनाबाहेर देखील काही तरुणांनी नळकांड्या फोडून पिवळा आणि लाल धूर सोडत घोषणाबाजी केली. संसदेबाहेर देखील एका तरुण आणि एका तरुणीला अटक करण्यात आली. या तरुणांकडून हुकूमशाही चालणार नाही, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या

संसेदेत गोंधळ घालणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी अमोल शिंदे आणि नीलम यांना संसद भवनाबाहेरून तर सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांना लोकसभेच्या सभागृहातून ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. याशिवाय त्यांच्या साथीदार असलेल्या विशाल नावाच्या तरुणाला पोलिसांनी गुरुग्राममधून ताब्यात घेतले आहे. सागर शर्मा (26), मनोरंजन डी (34), अमोल शिंदे (25) आणि नीलम (42) आणि विशाल यांना ताब्यात घेतले असून त्यांचा ललित नावाच आणखी एक जण सहकारी असल्याची माहिती आओहे पोलिसांनी या सहा तरुणांची चौकशी सुरू आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या सुरक्षेचा भंग करणारे हे 6 जण देशातील विविध शहरांतील असून त्यांनी मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून बोलून ही घटना घडवून आणण्याचा कट रचला, त्यासाठी ते हरियाणातील गुरुग्राम येथील एका फ्लॅटमध्ये एकत्र जमले होते. दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बुधवारी संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याच्या घटनेचा निषेध करत संयुक्त किसान मोर्चा किंवा भारतीय किसान युनियनचा या घटनेशी काहीही संबंध नाही असे म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून संसदेच्या सुरक्षेमध्ये झालेल्या त्रुटींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्या नेतृत्वाखालील समिती या घटनेची चौकशी करणार असल्याचे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. या समितीत इतर सुरक्षा यंत्रणांचे सदस्य आणि तज्ज्ञांचाही समावेश असेल असे ते म्हणाले. ही समिती संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींची कारणे शोधून कारवाईची शिफारस करेल.

बीएसपीचे लोकसभा सदस्य दानिश अली म्हणाले की, सागर शर्मा नावाच्या व्यक्तीचा पास म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या शिफारशीवरून करण्यात आला होता. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सरकारकडून उत्तर देण्याची आणि संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्याची मागणी केली. संसदेच्या सुरक्षेत हलगर्जीपणाची ही घटना 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या दिवशी घडली आहे. सभागृहात शून्य प्रहरात दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला लोकसभेत सदस्यांना म्हणाले की, आज घडलेली घटना आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. ही एक गंभीर घटना आहे. ज्या तत्परतेने आणि निर्भयतेने तरुणांना पकडले त्याबद्दल मी सर्व खासदार, सुरक्षा कर्मचारी, मार्शल, चेंबर स्टाफ यांचे अभिनंदन करतो. 2001 मध्येही याच दिवशी अशाच प्रकारे आमच्या केंद्रीय सुरक्षा दल, संसद सुरक्षा दल आणि इतरांनी तो हल्ला हाणून पाडला होता. ही घटना रोखण्यासाठी आपण केलेल्या सामूहिक प्रयत्नांसाठी आज मी सभागृहाचे अभिनंदन करतो. आम्ही या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करत आहोत. तपासाअंती जे निष्कर्ष समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल असे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close