क्राइमराज्यसातारा

मलकापूर येथील खूनप्रकरणी संशयितास तीन दिवसाची पोलीस कोठडी

कराड ः मलकापूर, ता. कराड येथील व्यंकटेश गृहनिर्माण सोसायटीमध्ये असणाऱ्या न्यू रिलॅक्स बारच्या पार्कींगमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून गुप्तीने भोकसून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना शनिवारी घडली होती. त्यातील संशयितास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुदर्शन ऊर्फ राजू हणमंत चोरगे (वय 26, रा. पोळ वस्ती, आगाशिवनगर, मुळ रा. गलमेवाडी, ता. पाटण) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर आदित्य पांडूरंग देसाई (वय 21, रा. कोल्हापूर नाका, कराड) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलकापूर येथील व्यंकटेश गृहनिर्माण सोसायटीनजीक सुदर्शन चोरगे आणि आदित्य देसाई याच्यात वाद झाला होता. त्यात आदित्य देसाई याने सुदर्शनच्या पोटावर गुप्तीने वार केला. त्यात सुदर्शनचा मृत्यू झाला. त्यानंतर आदित्य देसाई याला गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एस. तारू तपास करीत आहेत.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close