ताज्या बातम्याविदेशसातारा

भारतात सापडला कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट

नवी दिल्ली: जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना अद्याप संपलेला नाही. गेल्या काही काळापासून जगभरातील कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी त्याचा धोका अद्याप टळलेला नाही. अनेक वेळा या व्हायरसच्या विविध प्रकारांमुळे लोकांची चिंता वाढली आहे.

याच दरम्यान, याबाबत लोकांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. चीनमध्ये, जिथे ही महामारी सुरू झाली होती, तिथे आता कोरोनाचा नवीन सबव्हेरिएंट JN.1 ची प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

कोरोनाचे हा नवीन सबव्हेरिएंट सर्वप्रथम लक्जबर्गमध्ये आढळला. त्यानंतर यूके, आइसलँड, फ्रान्स आणि अमेरिकेतही त्याची प्रकरणे दिसू लागली. भारतातच कोरोनाच्या या सबव्हेरिएंटचं एक प्रकरण समोर आलं आहे. केरळमध्ये या नवीन सबव्हेरिएंट JN.1 ची पुष्टी झाली आहे. ही बाब समोर येताच सर्वांच्याच चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, कोरोनाचे हा सबव्हेरिएंट ओमायक्रॉन सव्हेरिएंट BA.2.86 चे वंशज आहे, ज्याला ‘पिरोला’ असंही म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते, JN.1 आणि BA.2.86 मध्ये फक्त एकच बदल आहे आणि तो म्हणजे स्पाइक प्रोटीनमधील बदल. स्पाइक प्रोटीन देखील स्पाइक म्हणून ओळखले जातो. हे व्हायरसच्या पृष्ठभागावर लहान स्पाइक्ससारखे दिसते. या कारणास्तव, लोकांमध्ये व्हायरसचा संसर्ग अधिक वेगाने होतो.

सीडीसीच्या मते, कोरोनाच्या या नवीन सबव्हेरिएंटची कोणतीही विशिष्ट लक्षणं अद्याप दिसलेली नाहीत. अशा परिस्थितीत, त्याची लक्षणं कोविड-19 च्या इतर प्रकारांपेक्षा वेगळी आहेत की नाही हे शोधणे कठीण आहे. जर आपण कोरोनाच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, सतत खोकला, पटकन थकवा, नाक वाहणं, अतिसार, डोकेदुखी यांचा समावेश आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close