राज्यसातारा

निवडणूक साहित्याचे टेंडर निघते सातारमध्ये पण टक्केवारी ठरवली जाते कराडमध्ये

जिथे साखर तिथे मुंग्या आणि जहाँ धुऑ है वहॉ आग भी होती है अशा म्हणीने जिल्ह्यात रंगली चर्चा

कराड : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून निवडणुकीसाठी लागणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या साहित्याचे टेंडर जरी सातार्यात निघत असले, तरी जिल्ह्यातील चर्चेचा सूर मात्र ठाम आहे “ कागदोपत्री सर्व प्रक्रिया साताऱ्यात होत असली तरी कामाचे खरे घोडे कराडमध्येच नांगरले जातात अशी चर्चा चांगलीच जोर धरू लागली आहे!” वरवर पारदर्शकतेची चादर पसरलेली असली, तरी आतून धुमसणाऱ्या धुराचा वास जिल्हाभर पसरत आहे.

निवडणुकीसाठी लागणारे मंडप, स्टेशनरी, झेरॉक्स मशीन, पिण्याचे पाणी, नाष्टा, चहा, जेवण, बॅनर, डिझेल आणि वाहने… या सगळ्यावर कोट्यवधींचे व्यवहार फिरतात. पण लोकांचा दावा असा की, “जिथं एवढा पैसा फिरतो, तिथं ‘निर्दोष प्रक्रिया’ हा फक्त एक स्वप्नवत शब्द असतो.” टेंडर जरी कोण घेतं याला महत्त्व नसतं; महत्वाचं असतं सब-टेंडर नेमकं कोणाला दिलं जातं.

आणि इथेच लोक सरळ बोलू लागले आहेत कराड दक्षिण आणि कराड उत्तर मतदारसंघात ही कामं नेहमी त्याच ठराविक मंडळींकडे वळतात. कारण? जवळीक, टक्केवारीचे ठरलेले दर, आणि कोणाची ‘पाठीमागची छत्रछाया’ या सगळ्यांनी हा खेळ वर्षानुवर्षे चालू ठेवला असल्याचे आरोप आहेत. लोक उघड म्हणतात “दिसतं ते खरं नसतं आणि खरं ते बोलता येत नाही.”

निवडणुकीचे बजेट कोट्यांत. आणि कोटींची हालचाल सुरू झाली की, टक्केवारीचे आकडेही आकाशाला भिडतात. म्हणूनच या कामांमध्ये काही लोकांचा वाढलेला उतावळेपणा सर्वांनाच दिसतो. एकजण तर थेट म्हणाला “हिशेब मोठा असेल तर बहीण-भावंडंही विसरतात… इथे तर फक्त टेंडर आहे!”

याचेही काही वरिष्ठांना अप्रत्यक्ष लाभ मिळत असल्याने जैसा राजा वैसी प्रजा म्हणीसारखे तिचं लोक वारंवार त्या ठिकाणी ठेवले जातात अशी चर्चा राजकीय प्रशासकीय वर्तुळात कुजबुजली जात आहे.

या व्यवहारातून वरिष्ठ लोकांनाही फायदे मिळतात ‘वरच्या गाठीला’ हेही लोक आता संकोच न करता सांगतात. कारण प्रत्येक मोठ्या व्यवहाराच्या मागे कोणाचं ना कोणाचं नाव असतंच. आणि या प्रकरणात लोकांचे बोलणे स्पष्ट “सबका फायदा फिट, म्हणून सबकी बोली हिट!”

दरम्यान, या सगळ्या कथित टक्केवारीच्या साखळीचा पुराव्यानिशी उलगडा लवकरच होणार असल्याची गोपनीय चर्चा सातार्यापासून कराडपर्यंत अंगावर काटा आणणाऱ्या वेगाने पसरत आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे निरीक्षण अचूकच “सत्य दाबून ठेवता येतं… पण ते फुटलं की तोंडांना कुलूप पडतं.”

सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या या हलचाली पाहता वातावरण चांगलंच तापलं आहे. टेंडरपासून टक्केवारीपर्यंत आणि टक्केवारीपासून नावांपर्यंत सर्व काही जणू उघडकीस यायच्या टप्प्यावर पोहोचले आहे. आता सगळ्यांच्या नजरा फक्त एका गोष्टीवर पहिलं नाव कुणाचं बाहेर पडणार?

पुढील भागात – निवडणूक विभाग पाटलांच्या ताब्यात, त्याच्या मंजुरी शिवाय कोणत्याही कामाला दिशाही मिळत नाही

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close