ताज्या बातम्याराजकियराज्य

शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा ठाकरे गटात एन्ट्री करण्यासाठी प्रयत्न

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा दावा

नाशिक : सध्या पक्षांतराचे दिवस सुरू झाले असून नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे ठाकरे गटात एन्ट्री करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

मात्र, खासदार गोडसे यांनी इन्कार केला असून ज्यांचा अशा अफवांवर नागरिक विश्वास ठेवणार नाही असे म्हटले आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद मिळाल्यानंतर बडगुजर यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्यामध्ये त्यांनी हेमंत गोडसे हे ठाकरे गटात येण्यास इच्छुक आहेत. मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत ते अनेकदा नार्वेकर यांना भेटले आहेत असा दावा केला मात्र त्यावर हेमंत गोडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. समाजकंटकांशी संबंध असलेल्या बडगुजर यांची कोणतीही विश्वासार्हता नाही त्यामुळे त्यांच्या त्यांच्या फसव्या अफवांवर कोणी विश्वास ठेवणार नाही असे गोडसे म्हणाले. आपण शिंदे गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असून त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे असे ते म्हणाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close