राज्यसातारासामाजिक

दौलतनगर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास प्रारंभ

पाटण : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर, ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये  पंधराव्या वर्षी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा प्रारंभ शनिवार दि. २० एप्रिल,२०24 रोजी भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाने भक्तीमय वातावरणात ह.भ.प.जयवंतराव शेलार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रंजना जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन केले.तसेच मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.यशराज देसाई (दादा), चि.जयराज देसाई (दादा) यांचे शुभहस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले.

सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी हि दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. यंदा या पारायणाचे पंधरावे वर्ष असून प्रति वर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 41 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० ते २३ एप्रिल, २०24 पर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे.

दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये 690 वाचक सहभागी झाले आहेत.पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार, प्रवनचनकारांना एक चांगले तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान यंदाचे  पारायण सोहळयास वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रति वर्षाप्रमाणे व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प.पुंडलिक महाराज कापसे,आळंदीकर हे उपस्थित असून रविवार दि. २१ एप्रिल, २०२4 रोजी ह.भ.प. उदय महाराज आटकेकर यांचे प्रवचन तर ह.भ.प. पांडूरंग महाराज साळूंखे, पलूस यांचे किर्तन आणि सोमवार दि.२२ एप्रिल, २०२4 रोजी ह.भ.प आनंद महाराज कुंभार बुधगाव सांगली यांचे प्रवचन तर ह.भ.प. श्रीराम महाराज अभंग इंदापूर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 41 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त मंगळवार दि. २३ एप्रिल २०२4 रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा. श्रीमती विजयादेवी देसाई (मॉसाहेब), मा. नामदार श्री. शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी करुन लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केल्यानंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. रामदास महाराज आरेवाडीकर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह, दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता होणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close