राजकियराज्यसातारा

कोरोना काळात झालेल्या भष्टाचाराचा बोलविता धनी कोण हे बाहेर काढणार..!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे सहित महाविकास आघाडीला टोला

पाटण ः कोरोनाच्या काळात जो भ्रष्टाचार झाला त्याचे बोलविते धनी कोण होते हे सर्वांना माहीत आहे मात्र त्यांना आम्ही लवकरच एक्सपोज करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते सातारा जिल्ह्यातील पाटण येथे सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, भाजपा प्रदेशाध्यक्ष भरत पाटील, भाजप पाटण मतदारसंघ समन्वय विक्रमबाबा पाटणकर, दलित महासंघाचे डॉ. मच्छिंद्र सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. फडणवीस पुढे म्हणाले, छत्रपती शिवरायांचे फक्त नाव लावून नाही तर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आज लोकसभेला सामोरे जात आहेत. भाजपा सरकार आले आणि सिंचन प्रकल्प मार्गी लागले. बंद पडलेल्या योजना आम्ही नव्याने सुरु केल्या. लोकांना ग्रहित धरले जात होते. राज्यकर्ते ची मानसिकता होती सगळी काम केली तर लोक आपल्या कडे येणार नाहीत परंतु मोदी सरकार आले आणि अनेक काम मार्गी लावली आहेत.
ही निवडणूक स्थानिक पातळीवरील नाही तर देशाच्या भवितव्यासाठी महत्वपूर्ण ठरणारी निवडणूक आहे. ही गल्लीची नाही तर दिल्लीची लढाई आहे.  लोकांच्या विकासाचा विचार करणार्यांना लोकांनी निवडून दिले पाहिजे. राहूल गांधी सोबत चोवीस जनांची खिचडी आहे. आपली विकासाची ट्रेन आहे. याला वेगवेगळ्या पक्षाचांचे डबे लागले आहेत. सर्वस्तरातील लोकांसाठी ही ट्रेन खुली आहे. या ट्रेनचा चालक नरेंद्र मोदी आहेत. इतरत्र मात्र फक्त डब्बे आहेत. विरोधकांचे इंजिन बंद पडलेले आहे. टप्प पडलेले इंजिन आहे. सातारा मतदारसंघात कमळ नावाचे बटण टाबा आणि बघा सातार्याचा विकास आणि कायापालट किती वेगाने होतोय. असे स्पष्ट करून ना फडणवीस पुढे म्हणाले, दहा वर्षात लोकांचा विकास झाला आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आमचे सरकार आहे. सन 2020 सालापासून लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. देशभरात युवकांना मुद्रा योजना आणली. महिला व मुलींना स्वतः च्या पायावर उभे केले आहे. आमच्या मंचावर महिला जास्त आता नसल्या तरी यापुढे 33 टक्के महिला आता राजकारणात दिसतील. बारा बलुतेदार यांचा विचार करुन बारा हजार कोटी त्यांना देऊन त्यांना वित्त साह्य केले आहे. आदिवासी साठी तेवीस हजार कोटी दिले. आज देशभरात लाखो तरुण उद्योग धंद्यात आहेत. शेतकर्यांसाठी व सिंचन प्रकल्पाला लाखो रुपये दिले.  काही लोक साखर कारखानदारी करतात परंतु मोदींनी साखरेला भाव देणे व कारखान्यांना मदत करुन इथेनॉल प्रकल्प आणले. शेतकर्यांवरचा इनकम टाँक्स रद्द करण्याचे काम मोदींनी केले आहे. कोविड काळात किड्यामुंग्यांसारखे लोक मरत होते. लस बनवणाऱ्या यादीत पाचवा देश भारत होता. भष्ट्राचाराचा पैसा लोकांच्या योजनांसाठी खर्ची होत आहे. देशाचा नेता देश सुरक्षित ठेऊ शकतो का हा विचार होणे गरजेचे आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अतिरेकी दहशतवादी हल्ले थांबले.
दरम्यान उदयनराजे यांना मत आपण देणार कमळाचे बटण आपण दाबणार म्हणजे मोदींना आपण मत देत आहोत. राहून गांधींमध्ये जे नाही ते मोदींकडे आहे. भाजप शिवसेना सख्खे भाऊ आहोत. अगोदर कमळाला मग धनुष्यबाणाला आपण साथ द्यायची आहे. गौरवशाली सातारची गादी, स्वाभिमानाची गादी, तंजावर ते पंजाब पर्यंत असलेल्या या परिसराला आपण राजकिय गादीला साथ द्यायची आहे असे आवाहन फडणवीस यांनी केले.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, पाटण तालुक्यात निसर्ग रम्य परिसर आहे परंतु या भागाच्या व्यथा ही तश्याच आहेत. अनेक कुटुंब चारकमानी होऊन आणि विस्थापित झाले. डोंगरी परिसराला नंदनवन करायचे असेल तर अँग्रो टुरिझम व टुरिझम प्रकल्प आम्ही राबवणार आहोत. स्थिर सरकार असते स्थिरता असते तेव्हा विकासाचा आराखडा तयार केला जातो. लहान गावांत आज शंभूराजांच्या प्रयत्नांची विकास झाला आहे. आज दहा वर्षांच्या कालावधी मोदींच्या नेतृत्वाखाली कायापालट होत आहे. याअगोदर फक्त घोषणा झाल्या लोकांना भावनिक करुन पोत्यांनी मत गोळा करायची हेच झाले. पन्नास पच्चांवन वर्ष देशाची स्थिती विधायक झाली. लोकांना मुलभूत हक्कांची पूर्तता करु शकले नाही. देशातील लोक शेतीवरती अवलंबून आहेत. घोषचा करायचे काम विरोधकांनी केल्या मात्र त्याची पुर्तता भाजपाने केली आहे. लोक काय आता पेढे देणार नाही तर चप्पल देणार हे माहिती असल्याने लोकांसमोर भाजपाचा वरती टिकास्र डागले जाते. संविधान बदलले जाणार ही नाहक भिती लोकांना दाखवली जात आहे. कदाचित महाविकास आघाडी हे नाव झोपेत दिले असेल कारण ती महाभकास आघाडी आहे.
काँग्रेस पक्षाने योजना राबवल्या असत्या तर आज लोकांची प्रगती झाली असती. किर्यानिस्ट, थर्डक्लास विचार सरणीच्या विचारांचे ते सरकार होते. महिला सक्षमीकरण, युथ डेव्हलपमेंट अनेक योजना आम्ही राबवणार आहोत. काम न करता लोकांसमोर जाण्याची या लोकांची लायकी तरी आहे का?
भारतीय जनता पार्टी भेदभाव करत नाही. राजकारण करत नाही. कराड चिपळूण रेल्वे मार्गाचा प्रस्ताव आम्ही दिला आहे तो मंजूर व्हावा ही मागणी आहे. काल ही मी तुमचा होतो आज ही आहे आणि उद्याही तुमचाचं असेण ही माझी ग्वाही आहे.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने अकरा सभा झालेल्या आहेत. ही निवडणूक स्थानिक पातळीवरील नाही तर देशाचे नेतृत्व कोणी करावे याचावरती निर्णय घेण्याची आहे. मोदींचे नेतृत्व देशाने स्विकारले आहे. आज सगळ्या देशाचे लक्ष या निवडणूक मध्ये लागले आहे. आजची स्थिती बदलली आहे. आम्ही चारही आमदार आमची विधानसभा निवडणुक असल्या सारखे वागलो आहोत. लोकसभेला आम्ही धनुष्यबाण कमळाला साथ देणार आगामी विधानसभा निवडणुकीत कमळ आम्हाला धनुष्यबाणाला मदत करणार हे आमचे ठरले आहे. तारळी जलप्रकल्प मध्ये दुसऱ्या टप्प्याचे काम आहे तो प्रस्ताव आम्ही देणार आहोत. तीन प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत आहेत त्यांना निधी दिला तर केरा मणदूरे भागात हरितक्रांती होणार. लोकनेते देसाई यांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत. चारपिढ्यांची निष्ठा तालुक्यात असून आम्ही तालुक्यासाठी झटत आहोत. आमदार नव्हतो तरी मी जनमाणसात वावरत होतो. मी गृहमंत्री असताना लोकनेते देसाई यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार द्यावा अशी मागणी केली होती. आपण केंद्राकडे या मागणीचा विचार करावा ही अपेक्षा आमची आहे. चांगल्या मताधिक्याने उदयनराजे यांना निवडणूक आम्ही देणार हा आम्ही निश्चय केला आहे.
यावेळी भाजप, शिवसेना राष्ट्रवादी मनसे या विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकनेत्यांना पद्मश्री मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे कार्य केले असून त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा मी केंद्र सरकार कडे लोकनेत्यांना पद्मश्री देण्याची मागणी करणार हा माझा शब्द असल्याचीही ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.

निवकने चिटेघर प्रकल्प हिरवा पट्टा होणार..!
पाटण तालुक्यातील निवकणे, चिटेघर, बिबी हे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत त्यांचे काम तारळी प्रकल्पाच्या धर्तीवर तातडीने पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांनी तातडीने दखल घेऊन पूर्ण करावेत असे झाल्यास हजारो एकर जमीन ओलिताखाली येऊन केरा विभाग हिरवा पट्टा निर्माण होईल अशी मागणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभूराज यांनी सांगितले आणि आम्ही मान्य नाही केले असे कधी झालेय का म्हणून तात्काळ ही मागणी मान्य केल्याचे जाहीर केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close