
कराड ः शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड कराड येथील मुख्य प्रवेशद्वारावर लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या नावाने उभारलेल्या स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 17/6/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित केला असल्याची माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांनी दिली.
स्वागत कमानीचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते व सिक्कीमचे माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि रयत संघटनेचे नेते रयत सहकारी साखर कारखाने चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणार आहे. शेती उत्पन्न बाजार समितीच्या प्रगतीमध्ये स्वर्गीय लोकनेते विलास काकांचे फार मोठे योगदान असून बाजार समितीने त्यांच्या नावाची कमान उभारून उतराई होण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. मार्केट यार्ड कराड येथील गेट नंबर 4 येथे कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रमास तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, युवक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांनी केले आहे.