
कराड ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील लाहोटी कन्या शाळेसमोर सूरू करण्यात आलेल्या ना नफा ना तोटा तत्वावरील स्वस्त वही विक्री केंद्राचा शुभारंभ मनसेचे जिल्हाअध्यक्ष ॲड. विकास पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष सागर बर्गे, पदाधिकारी, मनसैनिक व नागरीक उपस्थित होते.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेली 18 वर्षांपासून कराडला शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ना नफा ना तोटा तत्वावर स्वस्त वही विक्री केंद्र चालवण्यात येते. याचा कराड शहरासह ग्रामिण भागातील गोरगरीब पालक व विद्यार्थांना मोठा फायदा होत आहे. तसेच मनसेच्या वतीने दरवर्षी 40 गरीब व गरजू विद्यार्थांना दत्तक घेण्यात येत. या विद्यार्थांना संपुर्ण वर्षाचे शैक्षणीक साहीत्य व गणवेश देण्यात येतात. शुक्रवारी उदगाटन प्रसंगी बहुरूपी असलेल्या संभाजी पवार यांच्या पाल्याला शैक्षणीक साहीत्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना ॲड.विकास पवार म्हणाले की, वाढत्या महागाईने पिचलेल्या गोरगरीब पालक व विद्यार्थांना मनसेच्या स्वस्त वही विक्री केंद्राने मोठा दिलसा दिला आहे. मनसेच्या वतीने सामाजीक भान जोपासत गेली 18 वर्षांपासून ना नफा ना तोटा तत्वावर हा उपक्रम सुरू ठेवला आहे. त्यामुळे गोरगरीब पालकांची चांगली सोय झाली आहे.
सागर बर्गे म्हणाले की, शासनाच्या वतीने शाळेतील विद्यार्थांना मोफत पुस्तके देण्यात येत आहेत. वही, पेन व अन्य साहीत्य मात्र विद्यार्थांना स्वताला घ्यावे लागते आहे. वाढत्या महागाईमुळे समाजातील अनेक पालक आपल्या पाल्यांना शैक्षणीक साहीत्य घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थांना शिक्षण घेता यावे यासाठी मनसेच्या वतीने 18 वर्षापूर्वी हा उपक्रम सूरू करण्यात आला. यामुळे पालकांना मोठयाप्रमाणात अर्थीक दिलसा मिळत आहे. शहरासह ग्रामिण भागातील मोठयासंख्येने विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. जे विद्यार्थी शैक्षणीक साहीत्य विकत घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थांना मनसेच्या वतीने मोफत शैक्षणीक साहीत्याचे वाटप करण्यात येत असल्याचे सागर बर्गे म्हणाले.
यावेळी, नितीन महाडीक, प्रविण गायकवाड, हिंदू एकता आंदोलनाचे चंद्रकांत जिरंगे, लक्ष्मण पांढरपट्टे, स्वप्नील पवार, रघुनाथ बावडेकर, सुभाष कोळी, मनोज जैन, बंटी वाघ, निलेश चव्हाण, मनसैनिक, पालक व नागरीक उपस्थित होते.