ताज्या बातम्याराजकियराज्य
दिशा सालियन मृत्यूप्रकरणात भाजप नेते नितेश राणेंची चौकशी होणार !

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आता दिशा सालियन मृत्यूप्रकरणात भाजप नेते नितेश राणेंची चौकशी होणार आहे. आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती.
दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा राणे यांनी केला होता. याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी नागपूर अधिवेशनात त्यांनी केली होती. यानंतर सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचाही नितेश राणेंनी दावा केला होता.
दरम्यान, मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आलीय. आता मुंबई पोलीस आमदार नितेश राणेंची चौकशी करणार असून यामध्ये काय महत्त्वाची माहिती समोर येणार? राणे काय पुरावे सादर करणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.