
कराड ः कराड तालुका पोलिसांनी बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या छ. शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मंगळवारी सकाळी रूट मार्च काढण्यात आला.
कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत छ. शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी कार्वे येथे तर सायंकाळी रेठरे बुद्रुक येथे रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी यांच्यासह 21 पोलीस हवालदार व 41 होमगार्ड यांनी सहभाग घेतला होता.