राजकियराज्यसातारा

उत्तरेतून मनोजदादांना आमदार करणारच

उंब्रज येथे मनोजबंध कार्यक्रमात महिलांचा नारा

कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मनोजदादा घोरपडे या नेतृत्वाने महिलांना चुल आणि मुल या संकल्पनेतून बाहेर काढून जगण्याची नवी दिशा दिली आहे. महिलांचे विविध प्रश्न सोडवून त्यांचे स्वावलंबन करण्यासाठी मनोजदादा अहोरात्र धडपडत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही मनोजदादांनाच आमदार करणार असा नारा उंब्रज येथील आयोजित मनोजबंध कार्यक्रमात हजारो महिलांनी दिला.
     कराड उत्तरचे नेते मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी महिला सखी मंचच्या वतीने उंब्रज ता.कराड येथे मनोजबंध या कार्यक्रमास पाच हजारांवर महिलांनी हजेरी लावून आनंद घेतला. प्रसिद्ध निवेदन दीपक साबळे प्रस्तुत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली तसेच महाराष्ट्रातील डान्सर क्वीन घनिष्ठा काटकर व तेजल शिंदे यांच्या अदाकारीने कार्यक्रमात रंगत आणली. महिलांनी यावेळी मुक्तपणे जल्लोष साजरा केला.
   उंब्रज व पाल जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील महिला, माता भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होत्या. यावेळी प्रशासकीय सेवेत नियुक्ती झालेल्या कर्तृत्ववान महिलांचा मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दीपक साबळे यांच्या खेळ पैठणीचे या कार्यक्रमाने महिलांना खळखळून हसवून सोडले. महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटत जल्लोष केला. अनेक वयोवृद्ध महिलांसह मुलींनी गाण्याच्या तालावर ठेका धरला. यावेळी बोलताना अनेक महिलांनी मनोज दादाच्या माध्यमातून स्वाभिमानी सखी महिला मंच राबवत असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करून या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ निर्माण झाले आहे. महिलांना घरगुती व शेतातील कामातून येणारा  ताण हलका होण्यास मदत झाली शिवाय  मनोजदादांनी  मुक्त व्यासपीठ निर्माण करून दिल्याने कार्यक्रम पाहण्याबरोबरच त्यात प्रत्यक्ष सहभागी होता आल्याचा आनंद महिलांनी व्यक्त केला.
    यावेळी बोलताना तेजस्वीनी घोरपडे म्हणाल्या,  स्वाभिमानी महिला सखी मंच वतीने महिलांना येणारे विविध अडचणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनोजदादांच्या नेतृत्वाखाली सातत्याने काम सुरू आहे.  राज्य शासनाने सुरू केलेली लडकी बहीण योजना तसेच स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शिलाई मशीन, आटा चक्की,  वॉटर प्युरिफायर तसेच शेतकऱ्यांना फवारणी पंप वितरण सुरू आहे. तसेच मनोजदादा युवा मंच व महिला मंचच्या वतीने मतदारसंघात मोती बिंदू शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया, आरोग्य शिबिरे व उपचार व केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी विधानसभा निवडणुकीत  महिलांनी एकजुटीने काम करुन मनोजदादांना आमदार करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंगलताई घोरपडे, समताताई घोरपडे,
अंजलीताई जाधव, मीनाताई जाधव, उपसरपंच सुनंदा ताई जाधव, निशा भिसे पाटील, शोभा खडंग, शोभा जाधव, पूनम शेजवळ, मनिषा नलावडे, पल्लवी पवार, उज्वला बाबर, अनुराधा यादव, विमल सुपणेकर, शालिनीताई मोहिते, कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष मीनाक्षी पोळ, उपाध्यक्ष वैशाली मांडरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close