विधानसभा निवडणुकीचं वारं फिरलं, जरांगेंचे सैनिक इथं उमेदवार पाडणार?

जालना : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ आता जवळ आली आहे. पण त्याआधी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी कुणाला पाडणार आणि कुणाविरोधात लढणार या मतदारसंघाची नावं सांगितली आहे.
यामध्ये बरेच मतदारसंघ हे महायुतीच्या उमेदवारांचे आहे तर कुठे महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला मोठं वळण मिळालं आहे.
या मतदारसंघात उमेदवार पाडणार?
गंगापूर पाडणार
कन्नड लढणार
हिंगोली जिल्हा
-कळमनुरी पाडणार
परभणी जिल्हा
– गंगाखेड पाडणार
-नांदेड जिल्हा – हदगाव लढणार.
लातूर जिल्हा
औसा पाडणार
कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
– बीड जिल्ह्यातून केज राखीव मतदार संघ लढणार
– जालना जिल्ह्यातील मंठा परतूर ही विधानसभेची जागा लढवणार
– संभाजीनगरमधील फुलंब्री मतदार संघ लढवणार
– गंगापूर पाडणार तर कन्नड लढणार…
– औरंगाबाद पश्चिम पाठिंबा देणार
– हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी पाडणार
– हिंगोली मतदारसंघ लढवणार
– परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पाडणार
– पाथरी मतदारसंघ लढणार
मनोज जरांगे यांची रणनीती ठरली
मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक मराठा उमेदवार देणार
जिल्ह्यातील इतर ठिकाणी दलित मुस्लिम उमेदवार देणार
जिल्ह्यातील उरलेले जागा पाडणार किंवा पाठिंबा देणार
मनोज जरांगे पाटील यांनी मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्याआधी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जे निवडून येणार आहे तेवढेच मतदार संघ लढणार आहोत. थोडंच करायचं पण नीटनेटकं करायचे असे जरांगे यांनी सांगितले. आमच्या पुढे मोठा राक्षस आहे त्याची वाट आम्ही वाट लावणार असल्याचे त्यांनी म्हटले. उमेदवारी नाही मिळाली तर नाराज होऊ नका जातीकडे बघा असे आवाहन ही त्यांनी इच्छुकांना केले. निवडणुकीत पडून अपमान पचवायची ताकत आपल्यात नाही, असे सांगत आपल्याला थोडेच मतदारसंघ लढवायचे असून राजकारणाचे वेड लागू द्यायचे नाही असे जरांगे यांनी म्हटले.