उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची दोस्ती होणार? मविआ सोडणार, ठाकरे महायुतीत जाणार?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण एकमेंकाच्या विरोधात असणारे ठाकरे – फडणवीस आता पुन्हा एकमेंकांचा हात हातात घेण्याची शक्यता आहे.. फडणवीसांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानामुळे या चर्चेला ऊत आलाय. नेमकं हे विधान काय आहे आणि ठाकरे-फडणवीसांच्या महिन्याभरातल्या तीन भेटींमागचं काय गूढ आहे? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
ब्रम्हदेवापासून बाबा वेंगापर्यंत कोणीही महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे आता सांगू शकत नाही. एक तर तु राहशील किंवा मी. अशा शब्दात फडणवीसांना निर्वाणीचा इशारा देणारे उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर मविआत नाराज असल्याची चर्चा आहे.
त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेनं महापालिका निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी केलीय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आधी मित्र होते मात्र आता शत्रू नाही असं म्हणत पुन्हा मैत्रीचे संकेत दिले आहेत. तर राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिल्यामुळे ठाकरे-फडणवीस टाळी देणार का अशी चर्चा रंगू लागलीय.
मविआमध्ये फूट, ठाकरेंचा स्वबळाचा नारा, मुंबईपासून नागपूरपर्यंत एकला चलो रे केवळ या विधानामधून भाजप आणि ठाकरे गटाचे सूर जळतील असं नाही…तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरेंनी त्यांच्या भेटीची एकही संधी सोडलेली नाही.
महिनाभरात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या तीन वेळा भेटी झाल्या. नागपूर अधिवेशात 17 डिसेंबरला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची अभिनंदन करण्यासाठी भेट घेतली होती. त्यानंतर २० डिसेंबरला आदित्य ठाकरेंनी मुंबईत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
या भेटींमागे नेमकं काय दडलंय याची चर्चा आता या निमित्तानं सुरू झालीय. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे कमालीचे शांत आहेत. त्यामुळे ही वादळापूर्वीची शांतता आहे की आणखी काही याचं उत्तर भविष्यात मिळेलचं. मात्र मविआतून बाहेर पडण्याच्या ठाकरेंच्या हालचाली आणि महिनाभरात तीन वेळा भेटी झाल्यामुळे शत्रुत्वापासून मैत्रीपर्यंतचा प्रवास थेट युतीपर्यंत पोहचणार का? याबाबत आता सर्वांना उत्सुकता लागलीय.