क्राइमराजकियसातारा

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात

खाजगी इसमाकरवी तीन हजारांची स्वीकारली लाच; दोघांवर शहर पोलिसात गुन्हा नोंद

कराड ः कराडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती पाच हजार रुपये घेण्याचे ठरले. त्यातील खाजगी इसमाकरवी तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ही कारवाई केली. या कारवाईत संबंधित खाजगी इसमाने स्वीकारलेली तीन हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
भिमराव शंकर माळी (वय 37) कराड राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जवान रा. मलकापूर (ता. कराड) व मुस्तफा मोहिदिन मणियार (वय 25) देशी दारू दुकान मॅनेजर (खाजगी इसम) रा. लक्षीनगर, मलकापूर (ता. कराड) अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क, सातारा विभागाच्या पथकाकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कराड कार्यालयाचा जवान भिमराव माळी याने अवैध दारु विक्री केल्याबाबत तक्रारदार यांच्यावर नोव्हेंबर 2024 मध्ये कारवाई केली होती. त्यानंतर माळी याने सदर दाखल गुन्हयामध्ये मदत करण्याकरिता व पुन्हा दारु विक्रीचा धंदा चालू करु देण्याकरिता स्वतःकरिता प्रथम तक्रारदार यांच्याकडे सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. नंतर तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे कबुल केले. तसेच लाचेच्या रकमेरील तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता खाजगी इसम मुस्तफा मणियार याच्याकडे देण्यास सांगितले.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगलीचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे,पोलीस हवालदार ऋषीकेश बडणीकर, प्रितम चौगुले, सुदर्शन पाटील, विठठल रजपुत यांनी सापळा रचून बुधवार (दि. 5) रोजी लाचेच्या रकमेरील तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता पंचा समक्ष स्वीकारताना खाजगी इसम नामे मुस्तफा मोहिदिन मणियार रा. लक्षीनगर, मलकापूर (ता. कराड) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत खाजगी इसम मुस्तफा मणियार याच्याकडून स्वीकारलेली लाचेची तीन हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी भिमराव माळी व मुस्तफा मणियार या दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत तपास करीत आहेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलीस हवालदार ऋषीकेश बडणीकर, प्रितम चौगुले, सुदर्शन पाटील, विठ्ठल रजपुत यांनी केली.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close