
कराड : क्रीडा व युवकसेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा, सातारा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज तालीम आखाडा कराड येथे गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी 19 वर्षे वयोगटातील मुले व मुली यांची बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग विभागीय शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, इचलकरंजी महानगरपालिका, सातारा जिल्ह्यातील स्पर्धक उपस्थित होते.
रोटरी शिक्षण संस्थेचे सचिव विलासराव पाटील, घराळ बापू, स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र चे उपाध्यक्ष गणेश पवार, शहाजी पाटील सर, पैलवान संतोष शेवाळे, योगेश पाटील ,पवार सर, पवळे सर,आदी मान्यवर उपस्थित होते.
यातील विजयी स्पर्धकांची शालेय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच शालेय विभागीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग राज्यस्तरीय स्पर्धा अहमदनगर शिर्डी येथे पार पडणार आहेत.