ताज्या बातम्याराज्यसातारा

महिलेला नग्न फोटो पाठवणाऱ्या मंत्र्यावर सरकार कारवाई करणार का? संतप्त महिलेचा उपोषणाचा इशारा

सातारा : मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या जवळचे मंत्री अशी जयकुमार गोरे यांची ओळख आहे. फडणवीस यांनी गोरे यांच्याकडे महत्त्वाचे खाते दिले आहे. मात्र, जयकुमार गोरे यांच्यावर अनेक आरोप आहेत

तसेच कोरोना काळात त्यांनी मृतांच्या नावाखाली पैसे लुबाडल्याची प्रकरणाचीही चर्चा आहे. तसेच गोरे यांचा एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो अनेकदा एका महिलेला पाठवले आहेत. या प्रकरणी त्यांना तुरुंगवासही झाला होता. हे प्रकरण 2016 मधील आहे. मात्र, त्या महिलेला पुन्हा त्रास देण्यात येत असल्याने महिला संतप्त झाली असून ती जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि गोरे यांच्यावर करावाई करावी, यासाठी ती महिला 17 मार्चपासून विधीमंडळासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.

या महिलेने याबाबतचे पत्र राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मोठ्या नेत्यांना पाठवले आहे. या पत्रात तिने तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार सांगितला आहे. 2016 मध्ये गोरे यांनी अनेकदा या महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले होते. याबाबत महिलेने गोरे यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर गोरे यांना 10 दिवसांचा तुरुंगवासही झाला होता. त्यानंतर गोरे यांनी न्यायालयासमोर या महिलेची माफी मागत यापुढे अशा घटना घडणार नाही, याची हमी दिली होती. त्यानंतरही या महिलेवर दबावासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले.

आता काही दिवसांपासून या महिलेचे नाव उघड होईल आणि त्यांची बदनामी होईल, अशा प्रकारे गोरे आणि त्यांच्या समर्थकांकडून सोशल मिडायावर मेसेज टाकण्यात येत आहे. तसेच या महिलेला एक पत्रही आले आहे. या सर्व घटनांमुळे महिला आणि तिच्या कुटुंबीयांना अपमान आणि अनेक त्रासाला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता या महिलेने राज्यापाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मोठ्या नेत्यांना पत्र पाठवून 17 तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

या महिला हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वारसदार आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना लाच्छंनास्पद आहेत. महायुती सरकारच्या मंत्रिमंत्रिमंडळात अनेक कलंकीत मंत्री आहेत. अशाप्रकारे तुरुंगवास भोगलेले, न्यायालयाने तारेशे ओढलेल्या व्यक्तींना महत्त्वाचे खाते कसे देण्यात येते, असा सवाल उपस्थित होत आहे. गोरे यांच्या मतदारसंघात त्यांची आणि समर्थकांची गुंडगिरी मोठ्या प्रमाणात सुरू असते. या महिलेची न्यायालयासमोर माफी मागून पुन्हा त्रास देणार नाही, अशी हमी देणाऱ्या गोरे यांनी या महिलेच्या बदनामीसाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे आता या महिलेने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close