
कराड ः कराड तहसील कार्यालय येथे मंगळवारी सकाळी तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या हस्ते दिव्यांगांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.
यावेळी कल्पना ढवळे म्हणाल्या, कराड तालुक्यात तहसीलदार पदावर काम करताना एक वेगळाच आनंद मिळत आहे. कराड तालुक्यातील दिव्यांगाना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत. धान्य पुरवठा दारांनी दिव्यांग व्यक्तिंना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असे वर्तन करू नये. त्यांना नियमित वेळेवर धान्य वितरीत करावे.
यावेळी कराड तालुक्यातील सुमारे वीस ते पंचवीस दिव्यांग व्यक्तिंना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी पुरवठा अधिकारी शीला नायकवडी व पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.