
कराड : इंदोली पाल उपसासिंचन योजना ५० मीटर हेड वरून १०० मीटर हेड करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. त्याच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून झाली असून त्यांच्या सर्वेक्षणाचे काम चालू करण्यासाठी नियोजन बैठक कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी व सर्वेक्षण करणारी कंपनी यांची संयुक्त मिटींग इंदोली ता.कराड येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झाली.
यावेळी मा. घनवट साहेब, मा. भोसले साहेब, मा. पानस्कर साहेब, सुरेश तात्या पाटील, निवासराव निकम, बाळासाहेब साळुंखे, निखील संकपाळ, योगीराज सरकाळे, महेश बाबा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी इंदोली पाल उपसासिंचन योजनेचे सर्वेक्षण लवकरच पुर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली येण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सुचना संबंधित अधिकारी व कंपनीस केल्या.
यावेळी प्रसाद साळुंखे, संदिप पाटील, शहाजी मोहिते, पांडुरंग सावंत, दिगंबर भिसे, अनिल माने, सागर साबळे, विकास निकम, शहाजी देशमुख, शरद भोसले, प्रमोद निकम आदि परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
हणबरवाडी / धनगरवाडी पुर्णत्वाच्या दिशेने
हणबरवाडी टप्पा क्र.१ पुर्ण झाले असून टप्पा क्र.२ ची सुप्रमा अंतिम टप्यात असून लवकरच योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर येण्यासाठी जलद गतीने काम पुर्ण करण्याच्या सुचना करण्यात आल्या. धनगरवाडी टप्पा क्र.१ पुर्ण झाले असून टप्पा क्र.२ चे काम जास्तीत जास्त पुर्ण झाले असून विदयुत विभागाचे काम चालू आहे. या योजनेचे पाणी नोव्हेंबर अखेर शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध होणार आहे.
शामगाव, राजाचे कुर्ले, पारगाव सर्वेक्षण होणार
टेंबू उपसासिंचन योजनेमधून शामगाव, राजाचे कुर्ले, पारगाव, पुसेसावळी आदि गावांना पाणी देण्यासाठी शासन निर्णय झालेला आहे. त्याच्या सर्वेक्षणासाठी ४० लक्ष रु. निधी उपलब्ध झालेला आहे. त्याचे सर्वेक्षण येत्या आठवडयामध्ये चालू करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेस देण्यात आल्या.