राजकियराज्य

अजित दादांना पदाची हाव नाही….. मात्र त्यांना बदनाम करण्याचा डाव आखला जातोय…….? : मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील “सहकार क्षेत्र पारदर्शक ठेवा, त्यांना बदनामीची संधीच उरू देऊ नका,” असा स्पष्ट सल्ला देत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी मंत्रालयात प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व पत्रकार यांच्याशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली परखड व सडेतोड मते मांडली.माळेगावच्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, शिवसेना युती, शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते अगदी राष्ट्रवादीतील दुही यावर कोणताही आडपडदा न ठेवता भाष्य करत राजकीय वर्तुळातही खळबळ उडवून दिली.

हसन मुश्रीफ म्हणाले, “ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यापूर्वी अनेक पदांचा त्याग केला आहे.त्यांना पदासाठी राजकारण करायचं नाही. मात्र यावेळी माळेगावच्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीतून त्यांना देशासमोर आदर्श निर्माण करण्याचा करायचा आहे. सहकारी संस्था कशा पारदर्शकपणे चालवल्या जय शकतात याचा दादा आदर्श देऊ इच्छितात.”मात्र काहीं जण जाणूनबुजून अजित पवारां विरोधात सहकार क्षेत्रातल्या कामांवरून आरोप करत आहेत असे विचारता मुश्रीफ म्हणाले, “ही सगळी बदनामी करण्याची एक सुनियोजित योजना आहे.तरीही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही दादांनी एक लाख मताधिक्याने विजय मिळवला होता, हे विसरू नका.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोबतच्या युतीबाबत व रायगडच्या पालकमंत्री बाबत
विचारले असता त्यांनी सांगितले की “आम्हाला त्याबद्दल काही माहिती नाही,” मात्र रायगडच्या पालकमंत्री पदावरील वादात मुख्यमंत्री लवकरच तोडगा काढतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”रायगड सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात युतीत एकवाक्यता ही असायलाच हवी,” असेही त्यांनी यावेळी ठासून नमूद केले.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर झालेल्या आरोपांबाबत मुश्रीफ म्हणाले, “पूर्वीही आरोप झाले होते, पण युतीतील नेत्यांवर असे आरोप करणे योग्य नाही.” त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही नेत्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी माफक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सध्याच्या राष्ट्रवादीतील तुटलेल्या नात्यांबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, “विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेते आ.जयंत पाटील विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात काहीसे नाराज आहेत.त्यांचे मन लागत नाही. त्यामुळे आम्ही अनेकदा त्यांना सोबत येण्यास सांगितलं.पण पवार साहेबांच्या नुकत्याच केलेल्या विधानाने त्यांच्या अपेक्षा आता पार मोडल्या आहेत त्यातुन त्यांची निराशा झाली आहे.कारण आता तरी दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येतील अशी आशा होती.”

गप्पांच्या ओघात त्यांना अखेरीस बुधवारी माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून व सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रस्थ जयश्री पाटील यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये घेतलेला प्रवेश व त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर होणारा परिणाम यासंदर्भात विचारले ते ते ताडकन उत्तरले की,” हा प्रवेश फक्त एक राजकीय घटना नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे”,

एकंदरीतच आज गुरुवार असल्याने मंत्रालयाकडे बहुतांश मंत्र्यांनी पाठ फिरवणे पसंत केले. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आजच वर्धापनदिन मुंबईतल्या वरळी विभागातील डोम मध्ये असल्याने त्यांचे सर्वच मंत्री अगदी सकाळपासूनच तेथील तयारीचा प्रत्यक्ष घटनास्थळी आढावा घेण्यात मग्न. भाजपचे अवघे दोन मंत्री सोडता अधिकारी व कर्मचाऱ्यांना वगळता फारशी बाहेरून येणाऱ्या लोकांची तशी गर्दीही जाणवत नव्हती. मात्र काही कार्यालयीन आढावा बैठका व माळेगांव सहकारी संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्री हसन मुश्रीफ मंत्रालयात आले होते. अशावेळी सर्वच नियोजित बैठका संपल्याचा अंदाज आल्याने काही प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व व मंत्रालयातील पत्रकारांनी त्यांना त्यांच्या दालनात गाठले…. मगं काय सुरू झाला अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम…. या ओघात एक बाब स्पष्ट झाली की,हसन मुश्रीफ यांचा स्पष्टवक्तेपणा आणि राजकीय समीकरणांवरची भाष्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडींचे संकेत देऊन गेला. तरं
“दोषारोपांच्या चिखलात फसण्यापेक्षा सहकार क्षेत्रात पारदर्शकतेचा आदर्श निर्माण करा”, असा संदेश त्यांनी या चर्चांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे दिला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close