
कराड ः कराड उत्तरचे आ. मनोजदादा घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सातारा येथील कार्यालयमध्ये कराड तालुक्यातील निगडी घोलपवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी युवा नेते संग्राम घोरपडे, पंचायतराज उपाध्यक्ष गणेश जाधव, ओंकार पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने विकास कामे करणे सोपे झाले आहे. भाजपच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले. तर भाजपच्या माध्यमातून मतदार संघातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.
यावेळी युवा नेते शशिकांत घोलप, निगडी घोलपवाडी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुभाष महादेव घोलप, रमेश जाधव, संतोष थोरवे, राजेश बाईंग, तानाजी घोलप, तानाजी जाधव, लक्ष्मण जाधव, राजाराम घोलप, मारुती बबन घोलप, मारुती तानाजी घोलप, कृष्णात बाईंग, चंद्रकांत घोलप, संपत जाधव, आत्माराम घोलप, शहाजी घोलप, संतोष थोरवे, संदीप थोरवे, दादासो थोरवे, विठ्ठल घोलप, अनिल गायकवाड, पवन घोलप, बापू नाथा घोलप, प्रफुल घोलप, पैलवान सुरज घोलप, आकाश चंदुगडे, संतोष घोलप, भगवान खापे, वैभव घोलप, परशुराम घोलप, हणमंत चंदूगडे, प्रशांत चंदुगडे आदीसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपच प्रवेश केला.
यावेळी घोलपवाडीतील प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.