
कराड ः पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नारायणवाडी गावच्या हद्दीत मिनी बसने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये मिनीबसचा चाकल ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास घडली.
नरेंदर अजमेर सिंग (वय 54, रा. पंजाब) असे अपघातात ठार झालेले बसचालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंजाबहून मिनी बसची डिलीवरी देण्यासाठी बस बेंगलोरला निघाली होती. रविवारी सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नारायणवाडी गावच्या हद्दीत आल्यावर बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने पुढे चाललेल्या अज्ञात वाहनाला बसची पाठीमागून जोराची धडक बसली. यामध्ये बसचालक नरेंदर हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव करीत आहेत.