राज्यसातारा

नारायणवाडी ग्रामपंचायतीचा प्रेरणादायी उपक्रम!

“लखपती दिदी” अभियानासह स्वच्छ, समृद्ध आणि आदर्श गावाकडे वाटचाल

कराड : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिला बचत गट स्थापन करून जास्तीत जास्त महिलांना “लखपती दिदी” बनविण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतनारायणवाडी (ता. कराड) येथे विशेष मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रशांत माळी, पंचायत समिती कराड (उमेद) चे प्रभाग समन्वयक श्री. करण जाधव, तसेच रणरागिणी महिला ग्रामसंघ अध्यक्षा सौ. लता यादव उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना आर्थिक स्वावलंबन, बचत गटांचे महत्त्व आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले.
गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या गावाला योग्य दिशेने नेण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला.
सभा दरम्यान महिलांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 100% राबविण्याचा, तसेच गाव प्लास्टिकमुक्त करण्याचा आणि 15 नोव्हेंबरपर्यंत 100% पाणीपट्टी वसुली करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.
 हा उपक्रम केवळ नारायणवाडीपुरता मर्यादित न राहता इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरावा, असा हेतू व्यक्त करण्यात आला.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close