
कराड : किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेत मोठा भूखंड घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. या गृहनिर्माण संस्थेत अनेकजण मलिदा लाटण्याच्या तयारीत आहेत. हपापाचा माल गपापा या उक्तीप्रमाणे जे मिळेल ते पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. तर काही महाशय आणि संस्थेच्या सभासद पदाचा राजीनामा देऊन ही या गृहनिर्माण संस्थेत इंटरेस्ट असल्याचा दावा करीत आहेत. यामागे त्यांचा मूळ उद्देश काय आहे हे लवकरच जनतेसमोर येईल आणि त्यांना साथ देणारे स्वतःला समाजसेवक म्हणणारे महाभाग ही लवकरच समोर येतील.
विश्वसिटी न्यूज च्या हाती लागलेल्या कागदपत्रावरून व सूत्रांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्था कराड मलकापूर या संस्थेचे एकूण 55 सभासद संख्या होती. त्यापैकी बाबासाहेब आनंदराव गोरे यांची नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली होती.
नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेच्या 55 सभासदांच्या पैकी 7 सभासदांनी त्यांची संस्थेकडे भरलेली रक्कम मागे घेतली असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या सात सभासदांपैकी मधुकर आनंदा चवरे यांनी दिनांक 7/1/1981 साली त्यांना नियोजित किर्लोस्कर कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था कराड यांचे कडून त्यांची संस्थेत जमा झालेली रक्कम 260 रुपये रोख मिळाली व त्यांचा संस्थेशी कुठलाही संबंध राहणार नाही असे लेखी पत्र दिले असून त्या पत्रावरती तिकीट लावून त्यावरती मधुकर चवरे यांनी सही केल्याचे दिसून येत आहे.
जर मधुकर आनंदा चवरे यांनी नियोजित किर्लोस्कर गृहनिर्माण संस्थेच्या सभासद पदाचा राजीनामा देऊन आपली भरलेली रक्कम संस्थेकडून मागे घेऊन त्यांना तसे लेखी पत्र दिले असेल तर त्यांचा या नियोजित किर्लोस्कर गृहनिर्माण संस्थेशी काही संबंध राहतो का जर त्यांचा या संस्थेशी काहीच संबंध राहिला नसेल तर त्यांनी कोणत्या अधिकाराने या नियोजित किर्लोस्कर गृहनिर्माण संस्थेच्या विरोधात तहसीलदार कराड, उपविभागीय अधिकारी कराड, व जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केसेस दाखल केल्या आहेत.
तसेच मधुकर आनंदा चवरे यांच्या बरोबर समाजसेवक म्हणून त्यांना मदत करत आहेत ते काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण यांना मधुकर चवरे यांनी कोर्ट कचेरी व इतर ठिकाणी त्यांची बाजू मांडण्यासाठी अधिकार पत्र लिहून दिलेले आहे. जर मधुकर चवरे यांनी त्यांच्या सभासद पदाचा राजीनामा दिला असेल तर त्यांना काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण यांना अधिकार पत्र करून देता येते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
जर मधुकर चवरे यांनी या गृहनिर्माण संस्थेच्या सभासद पदाचा राजीनामा दिला असेल तर त्यांनी कोणत्या अधिकाराने काकासो उर्फ संजय चव्हाण यांना अधिकारपत्र करून दिले. यामागे त्यांचा नेमका उद्देश काय आहे हे पोलिसांनी शोधून काढणे गरजेचे आहे. एका राजीनामा दिलेल्या व्यक्तीने पुन्हा संस्थेत लक्ष घालणं हे कितपत योग्य आहे. यामागे नक्कीच काहीतरी डाळ शिजत असल्याची शंका नागरिक खाजगीत बोलून दाखवत आहेत.
क्रमशः