आता लोकांना धंगेकर कोण आहे ते कळेल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार रविंद्र धंगेकर हे शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. धंगेकर यांनी स्वताःह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पक्षप्रवेशाचे संकेतही दिले होते.
अखेर काल १० मार्च रोजी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत रात्री मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी योगायोग असा होता की धंगेकर यांचा वाढदिवसही याच दिवशी होता. त्यामुळे वाढदिवसाचा केक धंगेकरांनी यावेळी कट केला. यावेळी मंचावार शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, मंत्री उद्य सामंत, प्रकाश सुर्वे आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी आता लोकांना धंगेकर कोण आहे ते कळेल, असे ओपन चॅलेंजच दिले.
रवींद्र धंगेकर यांचा प्रवास नगरसेवकापासून आमदारापर्यंत झाला. ते एक आदर्श कार्यकर्ता आहेत. ते १० वर्ष शिवसेनेचे नगरसेवक होते. आता ते पुन्हा स्वगृही आले, असे एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांनी पक्षप्रवेश करताच वरील उद्गार काढले. आता तुम्ही शिवसेनेत आला आहात. आता लोकांना कळेल who is dhangekar? असे देखील शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. पोटनिवडणूक गाजली. मात्र एवढं करून पण धंगेकरांनी बाजी मारली आणि तिथे त्यांनी दाखवून दिलं लोकसेवक म्हणजे काय असतं. काँग्रेस हा वेगळ्या टाईपचा पक्ष आणि हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, असा टोलादेखील त्यांनी काँग्रेसला लगावला. इथे कामाने लोकनेता ओळखला जातो. तुम्हाला माहित आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. मी त्यांना काँग्रेसचे म्हणणार नाही, कारण ते मूळ शिवसेनेचे आहेत, असे शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. ते शिवसेनेत जाणार असल्याचे संकेत त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर दिले होते. अखेर त्यांनी काल रात्री शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या हाती धनुष्यबाण घेतले. या दिवसाचा योगायोग असा होता की धंगेकर यांचा वाढदिवस आणि पक्ष प्रवेश या दोन्ही गोष्टी जुळवून आल्या होत्या. धंगेकरांच्या पक्ष प्रवेशानंतर शिंदेंनी केक कापून त्यांना भरवला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.