राज्यसातारा

गौणखनिज मधील चोर प्रशासनावरती शिरजोर (भाग पाच)

अल्प बुद्धिवाल्या भामट्याचे कारनामे

कराड :अल्प बुद्धिवाल्या भामट्याला विचारणा करण्यात आली होती की स्वतःची जी हित संघ नावाची संघटना काढली होती जी उपोषणे केली होती त्यामधून समाजाच्या व इतर लोकांच्यासाठी त्याचा काय फायदा झाला हे त्याने सांगावे. त्याला याबाबत काहीच सांगता येत नाही म्हणून आजपर्यंत याबाबत काहीही माहिती त्याच्याकडून प्रसारित करण्यात आलेली नाही.

या मंदबुद्धी भामट्याने स्वतःवरील झालेला दंड शासनाने वसूल करू नये म्हणून शासनावरती दबाव तंत्र वापरण्यासाठी केलेले हे उद्योग आहेत. याच्या हित संघ संघटनेचा व उपोषणाचा कोणालाही काहीच फायदा झालेला नाही. या मंदबुद्धी भामट्याने स्वतःच्या फायद्यासाठी शासनास वेटीस धरण्याचे काम केले आहे. परंतु या मंदबुद्धी भामट्याने या दंडातून त्याची सुटका होईल असा गैरसमज दूर करावा. कारण काही लोकांनी हा झालेला दंड वसूल करून घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असा इशारा दिला आहे.

हा मंदबुद्धी भमटा स्वतःला स्वघोषित पत्रकार संपादक समजतो तो आज पर्यंत किती प्रेस मिटींगला हजर होता. त्याने स्वतःचे काढलेले साप्ताहिकाचे किती अंक काढले. याबाबत सर्व जनतेला माहिती आहे.
मराठी म्हणीप्रमाणे दोन पायतान हना पण मला संपादक म्हणा असे या मंदबुद्धी भामट्याचे वागणे आहे. ज्याची लायकी एक रुपया कमवायची नाही, घरच्या महिलांनी कमवायचे व या नशीड्याने रोज वाईन शॉप मधून बाहेर पडायचे. याने कोणी पत्रकार व संपादक व्हायचे हे बोलणे म्हणजे एक विनोदच आहे.
मंदबुद्धी शब्द वापरण्याचे कारण म्हणजे या मंदबुद्धी भामट्याला असे वाटते की तो एकटाच शिकलेला आहे. त्याला एकट्यालाच लिहिता वाचता येते, बाकीची अडाणी आहेत. ते दुसऱ्याकडून लिहून घेतात अशी त्याची समजूत आहे. म्हणून मंदबुद्धी भामट्याला सांगणे आहे की शेराला सव्वाशेर असतो फक्त वेळ आल्यानंतरच ते कळते.

या मंदबुद्धी भामट्याने तक्रारीच्या व उपोषणाच्या नावाखाली लोकांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये कमावले आहेत. हे पैसे संपले म्हणून हा भामटा शासकीय कार्यालयात रोज चक्रा मारत आहे. व ज्या लोकांच्याकडून पैसे घेतले आहेत, त्यांच्यावरती परत तक्रारी अर्ज करत आहे, अशी शासकीय कार्यालयात चर्चा सुरू आहे. या चर्चामध्ये सत्य असल्याचे दिसत आहे. कारण हा मंदबुद्धी भामटा शासकीय कार्यालयाच्या पायऱ्यावरती एखाद्या वाचमेना सारखा हातात कागदपत्रे घेऊन रोज उभा असतो.

एक मांजर चोरून दूध पीत असते त्याला वाटते कोणी बघत नाही म्हणून ते दूध पीत असते. परंतु एकाची अशी एक पेकाटात धोपाटी बसते तेव्हा त्याच्या लक्षात येते की, मला कोणीतरी पहात होते. अशा मंदबुद्धी भामट्याने व त्याच्या नात्यातील इतर लोकांनी गौणखनिज, पतसंस्था, पुरवठा विभाग, सेतू विभाग, व शिक्षण संस्था या ठिकाणी केलेल्या भानगडी पुराव्यानिशी लवकरच बाहेर येणार आहेत.

क्रमश :

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close