क्राइमराज्यसातारा

कराडातील व्यावसायिकास 90 लाखाचा गंडा

सांगली जिल्ह्यातील दोघा भावांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद

कराड : भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून व्यावसायीकाला तब्बल ९० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. कराड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन सख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज विष्णू साळुंखे (रा. मंगळवार पेठ, कराड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
नवीनकुमार सावंत व महेशकुमार सावंत (रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराडातील मंगळवार पेठेत राहणारे सुरज साळुंखे हे चांदीचा व्यवसाय करतात. व्यवसायानिमित्ते ते आंध्रप्रदेशमध्ये गेले असताना त्याठिकाणी त्यांची भिकवडी येथील नवीन सावंत याच्याशी ओळख झाली. त्यानंतर नवीन याने सुरज यांना कराडात दुकान सुरू करणार असल्याचे सांगून पैशाची मागणी केली. तसेच भागीदारीत व्यवसाय सुरू करू, असेही सांगितले. त्यामुळे सुरज यांनी याबाबत नवीनचा भाऊ महेश याच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर सोन्याचे दागिने गहाण ठेवून १५ लाख तसेच स्वत:जवळील १५ लाख असे ३० लाख रुपये सुरज यांनी नवीनला दिले. १६ जानेवारी २०२२ रोजी हा व्यवहार झाला. त्यानंतर आॅगस्ट २०२२ मध्ये महेश व नवीन दोघेही सुरज यांच्या कºहाडातील दुकानात आले. त्यावेळी सुरज यांनी चांदीबाबत विचारणा केली. मात्र, चांदीसाठी आणखी दहा लाख रुपयांची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यानुसार सुरज यांनी दहा लाख रुपये दिले. त्याबरोबरच जास्तीत जास्त चांदी आणायची असेल तर आणखी तीस लाख रुपयांची जुळणी कर, असे ते दोघे म्हणाले. त्यामुळे सुरज यांनी त्यांच्या मित्राकडून आणखी तीस लाख रुपये घेऊन नवीन आणि महेश या दोघांना दिले. त्यानंतर आणखी दहा लाख रुपये नवीनच्या बँक खात्यावर भरण्यात आले.
६ सप्टेंबर २०२१ पासून आजअखेर सुरज साळुंखे यांनी नवीन व त्याचा भाऊ महेश या दोघांना एकूण ९० लाख रुपये दिले. मात्र, एवढे पैसे देऊनही त्या दोघांनी सुरज यांना चांदी आणून दिली नाही. तसेच भागीदारीत व्यवसायही सुरू केला नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरज साळुंखे यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close