
कराड : गौण खनिज मधील महाभागाचे कारणामे
शासकीय जागेतून शासनाकडून गौण खनिज उत्खननासाठी 100 ते 200 ब्रासची परवानगी मागायची परवानगी मिळेपर्यंत अधिकारी हे त्या महाभागांना देव माणसे वाटतात परंतु परवानगी नाकारली अथवा 100 ते 200 ब्रासची परवानगी घेऊन 500 ब्रास उत्खनन करायचे जेव्हा जास्त उत्खनन केले म्हणून त्या महाभागांच्या वरती कारवाई केली की त्याला देवासारखे वाटणारे अधिकारी राक्षसासारखे वाटू लागतात.
त्यांनी कारवाई करू नये म्हणून त्यांच्यावरती संघटनेकडून तसेच उपोषण करून व माहिती अधिकार टाकून त्यांच्यावरती दबाव तंत्राचा वापर करायचा जेणेकरून आपण केलेली चुकी कोठे उघड होऊन आपल्या खिशाला चाट लागू नये व अशीच शासनाची फसवणूक करून आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत असे या महाभागांना वाटते.
या महाभागाने ज्या ज्या लोकांच्या बरोबर गौण खनिज चा व्यवसाय केलाय त्या सर्वांना त्याने चुना लावलाय
ना तुला ना मला घाल कुत्र्याला या मराठी म्हणी प्रमाणे या महाभागाचे वागणे आहे.
माझ्या चुकीमुळे माझा व्यवसाय बंद पडलाय हे लक्षात न घेता माझे बंद तर दुसऱ्याचे पण बंद झाले पाहिजे म्हणून या महाभागाने उपोषण करून तक्रारी अर्ज करून प्रशासनास वेठीस धरले तर काही लोकांच्याकडून तुमच्या वरती तक्रार करणार नाही म्हणून लाखो रुपये उकळले आहेत.
अशा महा भागाचा त्या त्रासलेल्या लोकांच्याकडून व काही समाजसेवकाकडून लवकरच
भांडा फोड होणार आहे.
तसेच गौण खनिज चा दंड बुडवून पाहणाऱ्या महाभागाकडून दंड वसूल करण्यासाठी आम्ही लवकरच पत्रव्यवहार करू असा इशारा काही समाजसेवकांनी दिलेला आहे. तसेच तहसील कार्यालयाच्या पायरीवर स्वतःला समाजसेवक समजणारा काळा सांड याची गौण खनिजच्या अनेक भानगडी लवकरच बाहेर येणार आहेत.
क्रमश :