
कराड : कापील जखिनवाडी फाटा ता. कराड येथे हॉटेल विश्वराज गार्डन शाखा क्रमांक तीन चा उद्घाटन समारंभ विश्वराज उद्योग समूहाचे युवा उद्योजक गणेश तुकाराम पवार उर्फ गोल्डन मॅन यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी काँग्रेसचे नेते अजित पाटील चिखलीकर, अशोकराव पाटील, विलासराव पाटील पोतलेकर, संतोष शेवाळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी युवा उद्योजक गणेश पवार म्हणाले, हॉटेल व्यवसायामध्ये मी प्रथम सुरुवात केली त्यावेळी या व्यवसायात मोठी चढाओढ पाहायला मिळाली, मात्र ग्राहकांना चविष्ट आणि स्वादिष्ट योग्य त्या मोबदल्यात सोयी दिल्या की ग्राहक पुन्हा आकर्षित होते. आणि आपल्या हॉटेलला भेट देते सर्वसामान्यांपासून अगदी मोठ्या उद्योजकांपर्यंत आमच्या हॉटेलची चव फेमस झाली आहे त्यामुळे सर्वांना परवडेल अशा किमतीत आमच्या हॉटेलमध्ये ग्राहक जेवणाचा भरपूर आनंद घेत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
यावेळी गणेश पवार मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.