राज्यसातारा

हवालदार प्रविण काटवटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कराड ः शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या प्रवीण बाळकृष्ण काटवटे (वय ५१, रा. दक्षिण तांबवे, ता. कऱ्हाड) यांचा मुंबईतील एका कार्यक्रमावेळी हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सोमवारी येथे आणण्यात आला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना पोलिस दलाच्यावतीने सलामी देवुन बंदुकीच्या तीन फैरी झाडुन मानवंदना देण्यात आली.

प्रवीण काटवटे हे १९९७ च्या दरम्यान पोलीस दलात भरती झाले होते. शहर पोलीस ठाण्यात सन २०१८ पासून कार्यरत आहे. रविवारी ते कुटूंबियांसोबत मुंबईतील एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अचानकपणे त्यांना हदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यांना रूग्णालयात नेण्यात आले होते, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यांचा मृतदेह सोमवारी दक्षिण तांबवे येथील त्यांच्या घरी आणण्यात आले. त्यावेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हदय पिळवटुन टाकणारा होता. बापु या नावाने ते परिचीत होते. पोलिल दलाच्यावतीने पोलिस उपाधिक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक राजु ताशीलदार, तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप याच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी पुष्पचक्र अर्पन करुन अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्यावर आज येथील स्मशानभुमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलाच्यावतीने सलामी देवुन बंदुकीच्या तीन फैरी झाडुन मानवंदना देण्यात आली. (कै) काटवटे यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी बुधवारी (ता. १२) सकाळी नऊ वाजता तांबवे येथील स्मशानभुमीत होईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close