
कराड : कापिल गावाच्या शांत मातीत अचानक राजकीय वादळ उठले आहे.कापिल गावातल्या मतदार याद्यांचा घोळ आता साधा प्रकार नाही—ही सरळ लोकशाहीच्या छातीवरचे व्रण आहेत. घर नाही, जमीन नाही, रेशन कार्ड नाही… आणि आधीच्या कोणत्याही निवडणुकीत नावेही नाहीत. तरी 2024 च्या विधानसभा निवडणुकीला अचानक नावे आकाशातून कोसळल्यासारखी याद्यांत बसवली गेली. “हत्ती लपला तरी शेपूट दिसतेच”, आणि इथे तर शेपूट नाही—थेट हत्ती रस्त्यावर उभा दिसतो आहे.
ही नावे कधीच कापिलमध्ये नव्हती, पण मतदान मात्र इथे येऊन दिलं. “ज्याच्या घरचा नाही तो गावचा कसा?” असा आक्रोश गावभर उसळलाय. 25 ते 60 वर्ष वयोगटातील हे लोक थेट मतदान बोथपर्यंत कसे पोहोचले, कोणाच्या छत्राखाली आले, आणि कोणाच्या हातून या यादीत घुसवले गेले—चोर कितीही हुशार असला तरी पाऊलखुणा सोडतोच आता त्या पाऊलखुणा दिसू लागल्या आहेत.
या सगळ्या प्रक्रियेत काही कार्यकर्ते, काही अधिकारी, आणि काही अनोळखी पुढारी — सगळे एकाच जाळ्यात गुंतले असल्याचा संशय गावागावात ठिणगीसारखा पसरतो आहे. “धूर दिसतो म्हणजे कुठेतरी आग लागलेली असतेच”, आणि त्या आगीचे लोळ आता प्रशासनाच्या दरवाज्यातही पोहोचले आहेत. मतदान नोंदणीचा पवित्र मार्ग ज्या हातांनी वाकवला, त्या हातांवर आता लोकांची नजर खिळली आहे. कारण “ तक्रारदार यांच्या नजरेत फक्त एकच दृढता या घोटाळ्याचा एकही धागा सुटू देणार नाही. आणि लोकशाहीची माती करणाऱ्यांना लोक आता माफी देणार नाहीत.
या रहस्यमय मतदार नोंदणीचा उलगडा करण्यासाठी कापिल गावातील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार हे तब्बल 48 दिवस झाले उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलनात बसले आहेत. “हक्काची लढाई तलवारीने नाही, जिद्दीने जिंकायची” याच भावनेने ते तळ ठोकून बसलेत. लोकशाहीला झोपवणाऱ्या कटाविरुद्ध ते जागरण करत आहेत. अन्यायाच्या अंधाराला चिरून न्यायाचे सूर्योदय उगवावा यासाठी चाललेली ही झुंज आता फक्त गावची राहिली नाही ही लोकशाहीची तपस्या बनली आहे. त्यांचा आवाज जितका दाबला जातो, तितकाच तो पर्वतासारखा उंच उभा राहतो. वाऱ्याला वळण देता येत नाही पण झंझावाताला तोंड द्यावच लागतं.कापिल गावाचा झंझावात आता प्रशासनाच्या दारात उभा आहे. आणि या झंझावातच्या मागे आहे लोकशाही वाचवण्याचा खोल आणि प्रखर आक्रोश.
मतदार याद्यांतील या काळ्या खेळाचा उलगडा तातडीने होणे गरजेचे आहे. कारण “अन्यायावर शांतता म्हणजे अपराधाला पाठीशी देणं”. जबाबदारांच्या टेबलावर अजूनही मौन पडलेलं आहे, पण तक्रारदारांची जिद्द आता दगड भेदणारा पाऊस बनली आहे. “दूध का दूध आणि पाणी का पाणी” करण्याची वेळ आली आहे—तेही तातडीने आणि कठोरपणे.
ही लढाई फक्त कापिल गावाची नाही… ही लढाई जनतेच्या शपथेची, संविधानाच्या प्रतिष्ठेची, आणि लोकशाहीच्या आत्म्याची आहे. “सत्याचा दिवा लहान असला तरी काळोख फाडून टाकतो. कापिल गाव आज तो दिवा पेटवत आहे—आणि ही ज्योत आता कुणीही विझवू शकत नाही.
जो गलत है… वो गलत ही रहेगा. समय बदलता है, चेहरे बदलते है… पर सच सामने आकर ही दम लेता है.आज काही बोगस मतदारांच्या नावाचा खेळ कापिल गावामध्ये उघडला आहे, परंतु लवकरच या खेळामागचे चेहरेही उघडतीलच.
पुढील भागात – बोगस मतदान वाढवण्यास उपविभागीय अधिकारी जबाबदार

