गोव्यात क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी पूर्ण सहकार्य करू ः क्रीडामंत्री गोविंद गावडे

पणजी : किक बॉक्सिंगसारख्या क्रीडायुद्धाच्या खेळाला गोव्यातील क्रीडाप्रेमींमध्ये वाढत्या उत्साह हा क्रीडाप्रेमींसाठी चांगला अनुभव आहे. गावा क्रीडा पर्यटन निर्माण करून गोव्यात क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी आपण पूर्ण सहकार्य करू असे प्रतिपादन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केले.
गोवा किकबॉक्सिंग एसोसिएशन (जीकेए) द्वारा आयोजित राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन 19 ते 22 जानेवारी 2025 दरम्यान पणजी येथील इनडोर स्टेडियम कैम्पलमध्ये क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी या खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल समाधान व्यक्त करत क्रीडा क्षेत्रात गोव्याचे महत्त्व वाढवण्याचा वचन दिला.
कार्यक्रमाची प्रस्तावना सदर महासंघाचे संस्थापक प्रमुख सी. ए. तांबोळी यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना गोवा किकबॉक्सिंग एसोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शेखर सालकर यांनी केली. श्री. सी. ए. तांबोळी यांनी स्पर्धेचे महत्त्व आणि किकबॉक्सिंग खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल चर्चा केली. त्यांच्या भाषणात क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन देणारे शब्द होते आणि स्पर्धेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बापूसाहेब दत्तात्रेय घुले यांची नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशन एनजी (वाको इंडिया) चे कार्यवाह अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
.या कार्यक्रमात किकबॉक्सिंग महासंघ (वाको इंडिया) चे पदाधिकारी आणि बोर्ड सदस्य देखील उपस्थित होते, यामध्ये सी. ए. तांबोळी (संस्थापक प्रमुख) बापूसाहेब घुले (कार्यवाहक अध्यक्ष), सैयद अकरामुल्ला हुसैनी (संयुक्त सचिव), यूनुस (बोर्ड सदस्य), गोपाल सेठ (बोर्ड सदस्य), मनीष कुमार शर्मा (बोर्ड सदस्य), एमआर. नौशाद आलम (बोर्ड मेंबर), अभिषेक गुप्ता (बोर्ड सदस्य), अम्बर अली (बोर्ड सदस्य), विष्णु (बोर्ड सदस्य), संतोष खैरनार (आयोजन सचिव) जयदेव म्हमाणे (तांत्रिक अधिकारी तथा आंतरराष्ट्रीय पंच). बाबुराव नाईक, शुभम ठुबे, संदीप पेडेकर यांचा सह इतर पंच व मान्यवर यांचा मंचावरती समावेश होता. स्पर्धेचा आयोजन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडत असून, विविध राज्यांमधून अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.