
कराड ः ऊस तोडणीकरीता 10 ऊस तोडणी कामगार देतो असे सांगून तिघा मुकादमांनी बेलवडे बुद्रुक येथील ट्रॅक्टर मालकाची सुमारे सात लाखाची फसवणूक झाली आहे. याबाबतची फिर्याद भास्करराव रामचंद्र मोहिते रा. बेलवडे बुद्रुक, ता. कराड असे फसवणूक झालेल्या ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे. याप्रकरणी तिघावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रविण विक्रम काळे (रा. माळेगाव, ता. माढा, जि. सोलापूर), अशोक शिवाजी देवकाते (रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), राजकुमार पिंक्या पवार (रा. डी-19, बोरगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भास्कराव मोहिते ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार म्हणून काम करतात. त्यांच्या मालकीचे दोन ट्रॅक्टर आहेतत. सन 2019-20 मध्ये ऊस तोडणीकरता मुकादम प्रविण काळे यांना ऊस तोडणीकरीता ॲडव्हान्स एक लाख 74 हजार रूपये कराड येथील बैलबाजार येथे दिले होते. त्यातील प्रविण याने 77 हजार रूपये फेडले व उर्वरीत 97 हजार रूपयेची परतफेड न करता व काम न करता मोहिते यांना काहीही न सांगता निघून गेला आहे. त्याला वारंवार पैसे मागूनही पैसे परत केले नाहीत.
सन 2019-20 मध्ये मुकादम अशोक देवकाते ऊस तोडणीकरता 22 कामगार पुरविण्याकरीता ॲडव्हान्स 12 लाख 20 हजार रूपये त्यातील काही रक्कम रोख व काही रक्कम आर.टी.जीसने बैलबाजार येथे दिली होती. त्यातील 7 लाख 45 हजार रूपये त्याने फेडले व उर्वरीत 4 लाख 75 हजार रूपयेची परतफेड न करता व काम न करता निघून गेले. त्याला वारंवार पैसे मागूनही पैसे परत केले नाहीत.
सन 2021-22 मध्ये मुकादम राजकुमार पवार याने ऊस तोडणीकरता 10 कामगार पुरविण्याकरीता ॲडव्हान्स 3 लाख 25 हजार रूपये त्यातील काही रक्कम रोख व काही रक्कम आर.टी.जीस.ने बैलबाजार येथे दिली होती. त्यातील 2 लाख 15 हजार रूपये त्याने फेडले व उर्वरीत 1 लाख 15 हजार रूपयेची परतफेड न करता व काम न करता निघून गेले. तिन्ही मुकादमांना वेळोवेळी पैसे मागूनही परत न केल्याने भास्करराव मोहिते यांनी कराड शहर पोलिसात तक्रार दिली असून त्यावरून तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.