क्राइमराज्यसातारा

धोंडेवाडी येथे विहिरीत बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

कराड तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

कराड : धोंडेवाडी (ता. कराड, जि. सातारा) येथे पोहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या १३ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कु. निनाद कुलदीप काकडे (वय १३, रा. धोंडेवाडी, ता. कराड, जि. सातारा) हा पोहण्यासाठी विहिरीत गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला तातडीने कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा प्राथमिक तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार शरद चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पुढील तपास करून नियमानुसार मुदतीत निर्गती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे धोंडेवाडी परिसरात शोककळा पसरली असून काकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close