
कराड : आदरणीय पी.डी.पाटील गौरव प्रतिष्ठान कराड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम या समाधी परिसरात आयोजित केलेल्या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा उत्साह संपन्न झाल्या.
या स्पर्धेचा शुभारंभ प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, शिवाजी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अरुण पाटील (काका) आणि मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला. राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी प्राथमिक विभागातून वेणूताई इंग्लिश मीडियम स्कूल विद्यानगर कराड, आदर्श प्राथमिक शाळा द्वारा श्री शिवाजी विद्यालय कराड, प्रॅक्टिसिंग स्कूल कराड, कराड नगरपरिषद शाळा नंबर ७, पोदार इंटरनॅशनल स्कूल कराड, कराड नगरपरिषद शाळा नंबर ९, कै काशिनाथ नारायण पालकर आदर्श विद्यालय कराड, संजीवनी इन्स्टिट्यूट मतिमंद मुलांची शाळा कराड व स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागातून वेणूताई इंग्लिश मिडीयम स्कूल विद्यानगर कराड, विठामाता विद्यालय कराड, श्री शिवाजी विद्यालय कराड, यशवंत हायस्कूल कराड, महाराष्ट्र हायस्कूल कराड या शाळांनी सहभाग नोंदवला. यावेळी प्रतिष्ठानने दिलेले देशभक्तीपर एक गीत आणि शाळेने बसविलेले एक अशी दोन गीते स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक शाळेतील विध्यार्थ्यानी सादर केली.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.बी. बी. कस्स्यप यांनी केले.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदरणीय पी.डी. पाटीलसाहेब पाणीपुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र माने ए. एन. मुल्ला, संभाजीराव पाटील सर्व शाळांचे शिक्षक, पालक आदी उपस्थित होते.



