क्राइमराज्यसातारा

कार्वे येथे मेंढपाळावर कुऱ्हाडीने वार, ग्रामीण पोलिसात चौघावर गुन्हा नोंद

कराड ः गावातील लोकांच्या शेतात तुमच्यामुळे आम्हाला आमची मेंढरे बसवता येत नाही. आम्हाला काही काम मिळत नाही असे म्हणत मेंढपाळास कुऱ्हाडीने मारहाण झाल्याची घटना कार्वे ता. कराड येथे मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मेंढपाळ प्रकाश विठ्ठल रानगे (वय 49, रा. नागाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर, सध्या रा. कार्वे चौकी ता. कराड) याने ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी चौघावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अजित तुकाराम पुजारी असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर विकास सुभाष हुलवान, दत्ता जनार्धन हुलवान, सचिन बिरोबा हुलवान, गणेश दादासो मेटकरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कार्वे ता. कराड येथील थोरातमळा येथील चंद्रकांत थोरात व रमेश थोरात यांच्या शेतात कार्वे येथील फिर्यादीच्या समाजाचे विकास हुलवान, दत्ता हुलवान, सचिन हुलवान, गणेश मेटकरी तेथे आले. त्यांनी फिर्यादीस तुमच्यामुळे गावातील लोकांच्या शेतात आमची मेंढरे बसवता येत नाही. आम्हाला काही काम मिळत नाही असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करू लागले. त्यावेळी विकास हुलवाने याने तेथे पडलेली कुऱ्हाड हातात घेऊन फिर्यादीचे दाजी अजित तुकाराम पुजारी यांच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यावेळी सोमनाथ पुजारी, मामा राजाराम पुजारी व फिर्यादी सोडविण्यासाठी गेले असता दत्ता हुलवान, सचिन हुलवान, गणेश मेटकरी यानी तेथे पडलेल्या लाकडी दांडक्याने हातावर, पायावर मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस हवालदार कांबळे करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close