
कराड ः कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिवर्तन झाले आणि मी आमदार झालो. परंतु ही आमदारकी सर्वसामान्य जनतेच्या प्रति समर्पित असून सर्वसामान्य लोकांची कामे करणे हेच माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन कराड उत्तरचे आ. मनोजदादा घोरपडे यांनी केले.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पुणे रहिवाशांचा कौटुंबिक स्नेह मेळावा आहेर गार्डन वाल्हेकरवाडी येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार शंकरशेठ जगताप, संग्रामबापू घोरपडे, मंगलताई घोरपडे, अशोकराव पाटील, रमेश चव्हाण संजय आबा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. मनोजदादा घोरपडे म्हणाले, आमदार झाल्यानंतर कराड उत्तर मधील एकही इंच जमीन ओलीता शिवाय राहणार नाही याची काळजी घेतली असून सर्वसामान्य लोकांची कामे सुलभ होण्यासाठी प्रत्येक महिन्याला जनता दरबाराची संकल्पना चालू केलेली आहे. या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची कामे एकाच जागेवरती होत आहे. उंब्रज उड्डाणपूल, हणबरवाडी धनगरवाडी पाणी उपसा सिंचन योजना,पाल इंदोली उपसा सिंचन योजना, गणेश वाडी उपसा सिंचन योजना, समर्थगाव उपसा सिंचन योजना, टेंभू उपसा सिंचन योजनेतून उर्वरित गावांना पाणी देणे. उंब्रज विश्रामगृह, उंब्रज अप्पर तहसील तसेच रस्ते निर्माण करणे इत्यादी महत्त्वाची कामे मार्गी लावलेली आहेत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद आजपर्यंत माझ्यावरती आहे असेच कायम राहावे. असे आवाहन आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केले.
यावेळी स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तर अध्यक्षा समताताई घोरपडे, स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तर कार्याध्यक्षा तेजस्विनीताई घोरपडे, धनंजय मोहिते, सुहास माने, विवेक साळुंखे, शिवाजीराव कणसे, सुभेदार मेजर संजय घोरपडे, सुजित साळुंखे, हणमंतराव माळी, कृष्णत शेडगे मामा, अनिल घोरपडे, गणेश डांगे, समाधान पवार, स्वप्नील माने, शिवाजी पाटील, सुनील बोराटे, कांतीलाल भोसले, रमेश चव्हाण, शरद पाटील, संभाजी ढाणे, विकास चव्हाण, गजानन ढाणे, सतीश यादव, प्रमोद घोरपडे, साई जाधव, नितीन जाधव, अक्षय मांडवे तसेच सर्व माता-भगिनी मनोजदादा घोरपडे युवा मंचचे मान्यवर सदस्य व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आभार अभ्युदय जाधव यांनी तर सूत्रसंचालन दीपक साबळे यांनी केले.
आमदार मनोजदादा यांच्या वरती जनतेचे किती प्रेम आहे हे उपस्थित गर्दीवरून लक्षात येते. पुणे येथे स्नेह मेळावा घेताना एवढी अलोट गर्दी होणे हे प्रेमाचे प्रतीक आहे. निवडणुकीच्या अगोदर इथे सर्वजण येऊन मेळावे घेतात. परंतु निवडणुकीनंतर मेळावा घेणारे आमदार मनोजदादा घोरपडे हे एकमेव आहेत.
– आमदार शंकरशेठ जगताप