
सातारा : १९ सप्टेंबर, २०२५ स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जि. प., सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सेवा पंधरवडा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र शासन महसूल विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” उपक्रमाचा शुभारंभ संपन्न झाला.
१७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत साजरा होणाऱ्या या उपक्रमाद्वारे समाजहिताच्या विविध उपक्रमांना चालना मिळणार आहे.
या प्रसंगी नामदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते



