
कराड ः कराड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी पक्ष वाढीसाठी एक दिलाने कार्यरत असून कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत आपण सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने कार्यरत राहून राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करूया असे आवाहन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केले.
कराड सर्किट हाऊस येथे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात कराड शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी उंडाळकर बोलत होते. राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष संजय देसाई, राजेश पाटील वाठारकर,कराड शहर राष्ट्रवादी नेते विजय यादव, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, प्रा. धनाजी काटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पक्षप्रवेश करणाऱ्या मध्ये युवक नेते राजेंद्र खोत, मुग्धा खोत, गौरी निगडे, सरिता हरदास, नागमणि सिंह, अन्नपूर्णा सिंहवल्लभ आवटे, पृथ्वीराज पिसाळ, विशाल शिंदे, वैभव शिंदे यासह अनेक कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
उंडाळकर पुढे म्हणाले, कराड तालुक्याला फार मोठा राजकीय वारसा आहे. आपण अजितदादाच्या नेतृत्वाखाली तो वारसा जपून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वांनी मजबूत करूया. सर्व कार्यकर्त्यांनी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यरत राहावे असे आवाहन ही त्यांनी केले.
राजेश पाटील वाटरकर म्हणाले, आपले पक्षाला अजितदादा सारखे खंबीर नेतृत्व लाभले आहे. अजित दादा हे कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेते आहेत याबरोबर नामदार मकरंद पाटील, खा. नितीन काका यांची कार्यकर्त्यांना साथ मिळत आहे आम्ही सर्व कराड तालुक्यातील नेते मंडळी व पदाधिकारी एक दिलाने कार्यरत असून उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड तालुक्यात राष्ट्रवादीला आपण मजबूत करूया असे आवाहन त्यांनी केले.
संजय देसाई म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी आता कंबर कसली पाहिजे आपला पक्ष शासनामध्ये असून शासनाच्या योजना आपण कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहूया. विजय यादव राजेंद्र खोत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली मान्यवरांच्या हस्ते कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक सुनील पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक धनाजी काटकर यांनी मांडले.