क्राइमराज्यसातारा

घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक, कराड शहर पोलिसांची कारवाई ः सुमारे 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कराड ः कराड शहर व परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या कराड शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एक महिला, एक पुरूष व एका विधीसंघर्ष बालकाचा समावेश आहे. यामध्ये दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक रिक्षा, दुचाकी व चोरी केलेली सोन्याची लगड असा सुमारे 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयितांनी कराडसह पुणे येथील पिंपरी-चिंचवड परिसरातही घरफोडी केल्या आहेत. यामधील आणखी एक संशयित आरोपी फरार असून त्याचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे उपस्थित होते.
तेजस्विनी पाटील, रोहन लोंढे दोघेही (रा. पिंपरी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुढे बोलताना पोलीस अधीक्षक तुषार दोषी म्हणाले, कराड शहर व परिसरामध्ये घरफोडी, रिक्षा चोरी सारखे गुन्हे दाखल होते. सदर गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कराड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी जाऊन संशयित सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून तसेच संशयित इसमांची गोपनीय माहिती घेऊन तपास सुरू होता. प्राप्त माहितीच्या आधारे आरोपींची कौशल्यपूर्वक माहिती प्र्राप्त केली. त्यातून सतत पाठपुरावा करून एक महिला, एक पुरूष व एका विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता सर्वप्रथम त्यांनी रिक्षा चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी कराड शहर व परिसरामध्ये विविध ठिकाणी दिवसा व रात्री नऊ ठिकाणी घरफोडी तसेच पुणे येथील पिंचरी-चिंचवड परिसरातही तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्याची लगड, ऑटो रिक्षा असा सुमारे 13 लाख 30 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, राजेश माळी, पोलीस उपनिरीक्षक दिपक वागवे, निखील मगदूम, कृष्णा डिसले, पोलीस हवालदार संदिप कुंभार, अशोक वाडकर, सतीश पाटील, वसीम संदे, संतोष पाडळे, सज्जन जगताप, अनिल स्वामी, मुकेश मोरे, दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, सुरेखा पुजारी, पुनम पाटील, मोहसीन मोमीन, धिरज कोरडे, निलेश विभुते, सोनाली मोहिते, आनंदा जाधव यांनी केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close